बारावीच्या ३६ काॅपबहाद्दरांवर लातू्र पथकाची कार्रवाई

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रांवर
बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मीडियाच्या व्हॉट्ॲपवर फिरल्याने यंत्रणा डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर, प्रशांत दिग्रसकर यांच्‍यासह शिक्षण विभागातील अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी विविध परीक्षा केंद्रांना आज भेटी देऊन पाहणी केली.

 

नांदेड : बारावी बोर्ड परीक्षेत सोमवारी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या पेपरला जिल्ह्यातील एकूण सात परीक्षा केंद्रांवर ३६ कॉपीबहादरांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये कॉपीमुक्तीविषयी जागृती करण्यात येत असली तरी एकाच दिवशी ३६ कॉपीबहाद्दर परीक्षार्थींवर लातूरच्या पथकाने केलेल्या कारवाईने कॉपीमुक्तीला मात्र, हरताळ फासला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्‍या परीक्षेसाठी विविध फिरत्या व बैठे पथकांसह जिल्‍हा परिषदेचे विविध खाते प्रमुख, अधिकारी व गटविकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कॉपीमुक्‍ती अभियानासाठी परिश्रम घेत आहेत. सोमवारी  सकाळच्‍या सत्रात विज्ञान शाखेचा भौतिकशास्‍त्र व वाणिज्‍य शाखेचा सचिवाची कार्यपद्धती या विषयाचा पेपर होता. यासाठी जिल्‍ह्यात एकूण २० हजार १२५ विद्यार्थ्‍यांपैकी १९ हजार ७६९ विद्यार्थ्‍यांनी परीक्षा दिली, तर ३५६ विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित होते.

जिल्‍ह्यातील पाच परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करणाऱ्या २९ विद्यार्थ्‍यांना निलंबित करण्‍यात आले. यात कुरुळा येथील श्री शिवाजी विद्यालय येथे सहा, कंधार तालुक्‍यातील गांधीनगर येथील पोस्‍ट बेसिक ज्‍युनिअर कॉलेजचे चार, शेकापूर येथील महात्‍मा फुले विद्यालयाचे तीन, मुखेड तालुक्‍यातील वसंतनगर कोटग्‍याळ येथील सेवादास  विद्यालयाचे आठ, तर मुखेड तालुक्‍यातील उमरदरी येथील नरसिंह विद्यालयाच्‍या आठ विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.

दुपारच्‍या सत्रात कला शाखेच्या राज्‍यशास्‍त्र विषयाच्या पेपरला २० हजार ४८४ विद्यार्थ्‍यांपैकी १९ हजार ६९१ विद्यार्थ्‍यांनी परीक्षा दिली, तर ७९३ विद्यार्थी अनुपस्थित होते. राज्‍यशास्‍त्र पेपरदरम्‍यान गैरप्रकार करणाऱ्या सात विद्यार्थ्‍यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कुरुळा येथील श्री शिवाजी विद्यालयाचे पाच, तर बाऱ्हाळी येथील विद्याविकास विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News