क्रिश शहापूरकर , अमेय दांडेकर यांची दमदार शतकी खेळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सेठ दगडूराम कटारिया प्रशालेने डॉन बास्को हायस्कूलचा २८० धावांनी पराभव केला.

पुणे : मुंबई इंडियन्स ज्युनियर गटाच्या आंतरशालेय पुण्याच्या टप्पाच्या क्रिकेट स्पर्धेत सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात पुण्याच्या क्रिश शहापूरकर आणि अमेय दांडेकरने शतके झळकावली.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सेठ दगडूराम कटारिया प्रशालेने डॉन बास्को हायस्कूलचा २८० धावांनी पराभव केला. कटारिया प्रशालेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३३९ धावा केल्या त्यात महत्त्वाचा वाटा क्रिश शहापुरकरने केलेल्या ५१ चेंडूत केलेल्या (१३०) शतकाचा  होता त्याला कृष्णा देवतसेने ७२ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. तर डॉन बॉस्को हायस्कूलला ९ बाद ६९ धावा करता आल्या यावेळी क्रिश शहापुरकरने दोन धावा देऊन तीन गडी बाद केले.  

दुसऱ्या सामन्यात सिंबायोसिस प्रशालेने प्रोडीगी पब्लिक स्कूलवर २३८ धावांनी विजय प्राप्त केला.   सिंबायोसिस प्रशालेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २९० धावा केल्या त्यात महत्त्वाचा वाटा अमेय दांडेकरने ७८ चेंडूत केलेल्या १२५ धावांचा होता त्याला सुश्रुत सावंतने नाबाद ४४ धावा करून सुरेख साथ दिली. प्रत्युत्तर देताना प्रोडीगी पब्लिक स्कूलला सात बाद ५२ धावा करता आल्या 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News