परीक्षार्थींना कॅापी पुरवण्यासाठी भिंतीवरून माकडउड्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

गोंधळामुळे परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. शहागडच्या परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.​

अंकुशनगर : शहागड केंद्रावर दहावीच्या परीक्षार्थींना कॉप्या देण्यासाठी मंगळवारी भिंतीवरून माकडउड्या मारताना दिसले.  कॉपी पुरवणाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही.
शहागडच्या केंद्रावर परिसरासह गोंदी, साष्टपिंपळगाव येथील दहावीचे विद्यार्थी परीक्षा देत आहे.

मात्र याठिकाणी परीक्षा सुरू होताच परीक्षार्थींना कॉपी पुरवण्याचे काम नातेवाईक, मित्र  करताना दिसले. शाळेच्या संरक्षण भिंतीवर चढवून  परीक्षार्थींना खिडकीतून कॉप्या पुरवल्या जात होत्या. परीक्षा केंद्र परिसरात गर्दी झाली होती. या गोंधळामुळे परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. शहागडच्या परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News