जागतिक T20 क्रमवारीत भारताची शेफाली शर्मा अव्वल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

खोडकर असलेल्या शेफालीने १६१ च्या स्ट्राईक रेटने १६१ धावा या स्पर्धेत फटकावल्या आहेत.ती जागतिक ट्‌वेंटी २० फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारी दुसरी भारतीय ठरली आहे.

मुंबई : सोळा वर्षीय शेफाली वर्मा अवघे १९ सामने खेळली आहे, पण त्यानंतरही तिने जागतिक ट्‌वेंटी २० महिला क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. शफालीने दोन वर्षे या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या सूझी बेटस्‌ हिला मागे टाकत ही कामगिरी केली आहे.

खोडकर असलेल्या शेफालीने १६१ च्या स्ट्राईक रेटने १६१ धावा या स्पर्धेत फटकावल्या आहेत. या स्पर्धेतील भारताच्या वाटचालीत तिचा मोलाचा वाटा आहे. ती जागतिक ट्‌वेंटी २० फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारी दुसरी भारतीय ठरली आहे. यापूर्वी ही कामगिरी मिथाली राजने केली होती, पण अवघ्या काही महिन्यांत शेफालीने सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. बल्लेवाली शफाली सोडल्यास केवळ स्मृती मानधनाच (६) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (९) या भारतीयच अव्वल १० फलंदाजांत आहेत. गोलंदाजांत दीप्ती शर्मा पाचवी, राधा यादव सातवी, आणि पूनम यादव आठवी आहे.

शेफाली खूपच खोडकर आहे. ती कायम आनंदित असते, तसेच ती संघात सकारात्मकता निर्माण करते. ती खेळाचा पुरेपूर आनंद घेते, असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले. त्याहीपेक्षा फलंदाजी करताना तिची आक्रमकता पाहून सहकारी फलंदाजांवरीलही दडपण दूर होते. ती सर्वांना प्रेरणा देते. तिच्यासारखी खेळाडू संघात हवीच असेही तिने सांगितले.
शफालीसारखी खेळाडू प्रत्येक क्षणाचा आनंद घेते.

आपल्या कामगिरीचा संघाला जास्त उपयोग होतो, याचा तिला आनंद आहे. अर्थात हे केवळ शफालीबाबतच नव्हे, तर संघातील सर्व खेळाडूंबाबत म्हणता येईल. आम्ही संघातील खेळाडू सर्वांकडून खूप काही शिकत असतो, एकमेकींना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करतो, असेही भारतीय कर्णधार म्हणाली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News