फ्रेंच ओपन स्क्वॉश स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

यश फडते याने २०१८ साली अमेरिकन ओपन ज्युनियर स्क्वॉश स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ज्युनियर स्क्वॉशपटू ठरला होता. आता फ्रेंच ओपन ज्युनियर स्क्वॉश विजेतेपद हे वास्को येथील प्रतिभाशाली खेळाडूची आणखी एक मोठी उपलब्धी आहे. आशियाई ज्युनियर स्पर्धेत गतवर्षी मकाव येथे यश रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. २०१४ साली त्याने जर्मनीतील पायोनियर ज्युनियर स्पर्धा जिंकली होती.

 

पणजी : फ्रेंच ज्युनियर ओपन स्क्वॉश स्पर्धेत भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू यश फडते याने संस्मरणीय कामगिरी नोंदविताना अजिंक्यपदास गवसणी घातली. ज्युनियर गटातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तो प्रथमच विजेता ठरला आहे. १८ वर्षीय यशला स्पर्धेत अव्वल मानांकन होते, विजेतेपदाचा करंडक जिंकून त्याने मानांकन सार्थ ठरविले. 

फ्रेंच ओपनमधील १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत यशने चमकदार खेळ करताना चेक प्रजासत्ताकाचा अव्वल खेळाडू मारेक पानाचेक याचे आव्हान यशस्वीपणे परतावून लावले. मारेक याला स्पर्धेत द्वितीय मानांकन होते. स्पर्धा फ्रान्समधील लिले येथे खेळली जात आहे. यशने धडाकेबाज खेळाची मालिका राखताना उपांत्यपूर्व लढतीत फ्रान्सच्या बाप्तिस्त बौईन याला ३-० (११-५, ११-७, १२-१०) हरविले. नंतर उपांत्य लढतीत फ्रान्समधील अव्वल मानांकित खेळाडू तौफिक मेकाल्फी याला चुरशीच्या लढतीत ३-२ (९-११, ११-६, ८-११, ११-७, ११-९) फरकान हरविले. १-२ फरकाने पिछाडीवर पडल्यानंतर जिगरबाज यशने नंतरचे दोन्ही गेम जिंकून अंतिम फेरीत जागा मिळविली. तुल्यबळ ठरलेली ही लढत १ तास व १५ मिनिटे चालली होती.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News