ऑलिंपिक पात्रता बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी भारतील बॅाक्सर सज्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

 जगातील विविध क्रीडा स्पर्धांना कोरोनाचा फटका बसत असताना त्यातून आशियाई ऑलिंपिक पात्रता बॉक्‍सिंग स्पर्धा बचावली आहे.

मुंबई : जगातील विविध क्रीडा स्पर्धांना कोरोनाचा फटका बसत असताना त्यातून आशियाई ऑलिंपिक पात्रता बॉक्‍सिंग स्पर्धा बचावली आहे. ही स्पर्धा उद्यापासून अम्मान येथे होत आहे. त्यातून ऑलिंपिकची पात्रता मिळवण्याचे भारतीय बॉक्‍सरचे लक्ष्य आहे.

जागतिक उपविजेता अमित पंघल याच भारतीय बॉक्‍सरला पुरुषांच्या स्पर्धेत मानांकन आहे. तो ५२ किलो गटात असेल. महिलांच्या स्पर्धेत मेरी कोम (५ - ५१ किलो), लोविना बोर्गोहैन (२ - ६९ किलो) आणि पूजा राणी (४ - ७५ किलो) यांना मानांकन क्रमवारीत स्थान आहे. या स्पर्धेतून एकंदर ६३ बॉक्‍सर ऑलिंपिकला पात्र ठरतील. त्यामुळे ते उपांत्य फेरीतील प्रवेश तिकीट पक्के करतील.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News