ऑलिंपिक तलवारबाजी स्पर्धा घेण्याची भारताने दाखवली तयारी.  (sports)

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

मुंबई : ऑलिंपिक पात्रता फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धा घेण्याची भारताने तयारी दाखवली आहे. मूळ कार्यक्रमानुसार ही स्पर्धा दक्षिण कोरियात होती. त्यांनी यजमानपदातून माघार घेतल्यानंतर या स्पर्धेच्या संयोजनास फार कोणी उत्सुक नसल्याचे समजते.

मुंबई : ऑलिंपिक पात्रता फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धा घेण्याची भारताने तयारी दाखवली आहे. मूळ कार्यक्रमानुसार ही स्पर्धा दक्षिण कोरियात होती. त्यांनी यजमानपदातून माघार घेतल्यानंतर या स्पर्धेच्या संयोजनास फार कोणी उत्सुक नसल्याचे समजते.

आशियाई ऑलिंपिक पात्रता फेन्सिंग स्पर्धा घेण्यासाठी विविध देशांनी पुढे यावे, असे आवाहन आशियाई महासंघाने केले आहे. त्यास भारताने अनुकूल प्रतिसाद दिला आहे. आशियाई ऑलिंपिक पात्रता तसेच आशियाई स्पर्धा लांबणीवर पडली आहे. आशियाई स्पर्धा जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे, पण ऑलिंपिक पात्रता स्पर्धा एप्रिलपूर्वी घेणे बंधनकारक आहे.

आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा तीन दिवसातही होऊ शकेल. पण संयोजनाची तयारी दाखविताना आठ गोष्टींची पूर्तता आवश्‍यक आहे. त्यात कोरोनाचा देशातील प्रादूर्भाव तसेच विमानसेवेवरील निर्बंध याचा आवर्जून उल्लेख आहे. त्यानंतरही भारताने नवी दिल्लीचा यजमान म्हणून विचार करावा, असे सुचविले आहे. 

स्वीस फुटबॉल लीग स्थगित

स्वीस फुटबॉल लीग तातडीने स्थगित करण्यात आली आहे. या लीगमधील सुपर लीग तसेच द्वितीय श्रेणीच्या गटातील लढती २३ मार्चपर्यंत स्थगित करण्याचे ठरले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय झाला आहे. स्वीस लीगमधील २० क्‍लबच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला आहे. स्विस सरकारने एक हजार व्यक्तींचा सहभाग असलेल्या सर्व कार्यक्रमांना १५ मार्चपर्यंत मनाई केली आहे. त्यानुसारच हा निर्णय झाला आहे. प्रेक्षकांविना लढती घेणे परवडणार नाही, असेही क्‍लबनी म्हटले आहे. यापूर्वीच तेथील स्वीस हॉकी स्पर्धा आणि जिनीवा मोटर शो लांबणीवर टाकण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमध्ये एका आठवड्यात कोरोनाचे वीस रुग्ण आढळले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News