आयआयटी मुंबईने पटकावला अव्वल क्रमांक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीतही ५३ व्या स्थानावरून ४४ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

मुंबई : क्‍यूएस (क्वाक्वारेली सिमंड्‌स) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगतर्फे देशातील अव्वल विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत आयआयटी मुंबईने देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीतही ५३ व्या स्थानावरून ४४ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

क्‍यूएस (क्वाक्वारेली सिमंड्‌स) वर्ल्ड युनिव्हर्सिटी  रॅंकिंगमध्ये आयआयटी मुंबईने १०० पैकी ४९.४ गुण मिळवले. शैक्षणिक कार्याबाबत ५४.२ गुण, कर्मचाऱ्यांच्या वागणुकीसाठी ७१.२ गुण, शिक्षकांबाबत ३.४ गुण, शिक्षक व विद्यार्थी गुणोत्तरासाठी ४५.८ गुण आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांबाबत १.६ गुण मिळाले आहेत.

आयआयटी मुंबईने दर्जा सुधारण्याबाबत केलेल्या विविध प्रयत्नांना यश आल्यामुळे जागतिक क्रमवारीत तब्बल नऊ स्थानांनी प्रगती झाली आणि देशात अव्वल क्रमांक पटकावता आला.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News