बायको देता का बायको या चित्रपटातून 'तो' करतोय मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 February 2020

आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग या चित्रपटात गमतीशीररित्या मांडण्यात आले आहेत.

नव्या दमाच्या कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चांगल्या संधी मिळत आहेत. आता त्यातीलच एक कलाकार म्हणजे सुरेश ठाणगे. ‘बायको देता का बायको’ या चित्रपटाच्या दिग्दर्शन-लेखनाची जबाबदारी सुरेशने तर पेललीच; पण त्याचबरोबरीने या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला सुरेशचा प्रवास आता अभिनेत्यापर्यंत पोहचला आहे.

आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग या चित्रपटात गमतीशीररित्या मांडण्यात आले आहेत. एक दिग्दर्शक, लेखक, अभिनेता म्हणून काम करताना खूपच नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचे सुरेशचे म्हणणे आहे. सुरेशबरोबरच सुनील गोडबोले, श्‍वेता कुलकर्णी, आरती तांबे आदी कलाकार या चित्रपटात भूमिकेत दिसतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News