नेमबाजीचे धडे गिरवत 'त्याने' केली विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 January 2020

अंतिम फेरीत नेमबाजी करताना खूपच मजा आली. त्यामुळे या यशाचा आनंद घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंतिम फेरीत विश्‍वविक्रमी कामगिरी करण्याचे लक्ष्य बाळगले होते. ते साध्य झाल्याचा खूप आनंद आहे. ही कामगिरी नक्कीच समाधान देत आहे.

मुंबई : सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील, पण नेमबाजीचे धडे पनवेलमध्ये गिरवत असलेल्या किरण जाधवने राष्ट्रीय नेमबाजी चाचणीत विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी केली. त्याने १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत विश्‍वविक्रमापेक्षा जास्त गुणांचा वेध राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत घेतला.

तिरुवअनंतपुरम येथील स्पर्धेत किरणने प्रजासत्ताकदिनी ही कामगिरी केली. प्राथमिक फेरीत सहावा असलेल्या किरणने अंतिम फेरीत २५३.४ गुणांचे लक्ष्य साधले. चीनच्या यू होआनान याने २५२.३ गुणांचा जागतिक विक्रम केला आहे. आता ही कामगिरी जागतिक विक्रम म्हणून गृहित धरली जाणार नसली तरी भारतीय नेमबाजीसाठी हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे.

नौदलातील किरण हा सुमा शिरूर यांच्या लक्ष्य अकादमीत नेमबाजीचे धडे गिरवतो. प्राथमिक फेरीत हृदय हजारिका (६३०.७), शाहू मानेने किरणला (६२९.३) मागे टाकले होते, पण अंतिम फेरीत तो बहरला. 
किरण भारतीय नेमबाजीसाठी नवीन नाही. आशियाई स्पर्धेत त्याची अंतिम फेरी थोडक्‍यात हुकली होती. सुमासाठी हे यश खूपच मोलाचे आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक नेमबाजांची कामगिरी उंचावली, पण आपण पैलू पाडलेल्या किरणचेे यश सुमाला जास्त सुखावत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News