समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा म्हणून 'तो' देतोय शिक्षणाचे धडे

प्रशांत देशपांडे
Tuesday, 28 January 2020

आपला समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा म्हणून एक तरुण पालावरची शाळा चालवतोय. पाच वर्षांपासून त्याचे हे काम सुरू आहे. चार ते १४ या वयोगटातील मुले सायंकाळी सहा ते आठ या वेळेत या शाळेत येऊन मुळाक्षरे गिरवतात. शाळेत देशभक्ती, संस्कारयुक्त गोष्टी आणि आरोग्यदायी शिक्षण व विविध खेळाचे धडे दिले जातात. त्याचे नाव आहे सिकंदर कासार.

सिकंदर लहान असतानाच पित्याचे छत्र हरपले. घरात त्याची आई व एक भाऊ असा परिवार आहे. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य असल्यामुळे सिकंदरला काम करून शिकावे लागते. पोळपाट, रवी, लाटणे, झटकणी, मुसळ, वनकी, जात्याचा खुंटा, सोफासेटचे पाय या लाकडाच्या वस्तू व त्यावरील विविध नक्षीकाम सिकंदर अगदी सफाईदारपणे करतो.

२२ वर्षांचा सिकंदर दिवसभर कष्टाची कामे करून येणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबास हातभारही लावतो. सिकंदरचे कार्य पाहून माहेश्वरी महिला मंडळाने या पालांवरच्या शाळेला तीन वर्षांसाठी दत्तक घेऊन शालेय साहित्य पुरवत मदतीचा पहिला हात दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सिकंदरचं काम यमगरवाडीपर्यंत पोहचले. येथील शाळेला भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आज शैक्षणिक साहित्य पुरवते. पाच वर्षांखाली कॅरम बोर्डचा फळा करून १७ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आणले. सध्या त्याच्या अभ्यासिकेत ३२ विद्यार्थी आहेत. सिकंदर सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरातील पारंपरिक व्यवसाय असणारे सुतार काम करतो. त्यानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News