हर्षवर्धन सदगीरला पुन्हा एकदा 'महाराष्ट्र केसरीचा' किताब

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

मंत्री थोरात यांच्या हस्ते सदगीरला एक लाख रुपये व मानाचा चषक देऊन गौरविण्यात आले. भव्य मैदानावर सुमारे २० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने सदगीर याने हा विजय संपादन केला.

संगमनेर : काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’ गदा मिळविणारा पैलवान हर्षवर्धन सदगीर पुन्हा एकदा चॅम्पियन ठरला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वेल्हाळे येथील हरीबाबा तरुण मंडळातर्फे नुकतीच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा झाली. तीत ‘महाराष्ट्र केसरी’ सदगीर याने ‘हरियाना चॅम्पियन’ रोहित कुमार याच्यावर विजय मिळविला.

मंत्री थोरात यांच्या हस्ते सदगीरला एक लाख रुपये व मानाचा चषक देऊन गौरविण्यात आले. भव्य मैदानावर सुमारे २० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने सदगीर याने हा विजय संपादन केला. स्पर्धेत देशभरातून आलेल्या १३० पैलवानांनी सहभाग घेतला. मंत्री थोरात म्हणाले, ‘‘तन-मनाची मशागत करणारा, मन चंचल ठेवणारा कुस्ती हा मैदानी खेळ उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. हा रांगडा खेळ महाराष्ट्राचे वैभव आहे. राज्याच्या मातीतल्या या मराठमोळ्या खेळाला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. ग्रामीण मातीतल्या हर्षवर्धनने ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकून नगर जिल्ह्याचे नाव  मोठे केले.’’
आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, आयोजक तान्हाजी शिरतार, सीताराम राऊत, सात्त्विक पंडित आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी हरीबाबा तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News