राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पेणच्या खेळाडूंची बा़जी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 March 2020

उद्‌घाटन युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे यांच्या हस्ते झाले

वडखळ : पनवेल येथे शेतोकान असोसिएशनच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत पेणच्या खेळाडूंनी यश मिळविले.

उद्‌घाटन युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत पेण येथील कराटे स्पर्धकांनी एकूण २८ सुवर्णपदक, २४ रौप्यपदक, १० कांस्यपदक पटकावून प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिपचा चषक पटकावला. विजयी खेळाडूंची नैनिताल येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

बक्षीस वितरण युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी विनित साठे, सागर कोळी, नीलेश भोसले, प्रशांत घांगुर्डे, चिंतामणी मोकल आदी उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News