नाईक महाविद्यालयात पदवीग्रहण सोहळा संपन्न

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Thursday, 5 March 2020
  • प्रसंगी आमदार गणेश नाईक यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
  • आंतरमहाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धेत विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

नेरूळ : कोपरखैरणे येथील नाईक महाविद्यालयाचा चौथा दीक्षान्त सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा  सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आमदार गणेश नाईक यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

पदवीधर विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने एफ. जी. नाईक महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार गणेश नाईक, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक, एकनाथ पाटील, मुख्याध्यापक सुधीर थळे, मुख्याध्यापिका योजना तिगडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय; तसेच आंतरमहाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धेत विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या अनिता सानप, प्रतीक्षा गटे, रजत शिंदे, निकिता म्हात्रे, प्रवीण जाधव, शीतल मोरे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News