'या' चित्रपटात गोविंद नामदेव साकारणार महत्त्वाची भूमिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

अभिनेता गोविंद नामदेव यांनी बऱ्याच चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.

अभिनेता गोविंद नामदेव यांनी बऱ्याच चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘ओ माय गॉड’, ‘वॉण्टेड’, ‘सिंघम’सारखे त्यांचे बरेच चित्रपट गाजले. आता लवकरच ते एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

‘भूल भुलैया २’ या चित्रपटात ते महत्त्वाची भूमिका साकारत असून, त्यांचे चित्रीकरण जयपूरमध्ये सुरू आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहेत. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांचे असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News