अोबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास सरकार सकारात्मक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीच्या आठ योजना सुरु आहेत. यामध्ये ऑनलाईन  अर्ज प्राप्त  होतील त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. 

मागास आणि बहुजन कल्याण विभागमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत  सरकार ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यास सरकार सकारात्मक आहे असे सांगितले . तसेच शिष्यवृत्तीच्या  रक्कमेचा पहिला हप्ता पुल खात्यात जमा केला असून दुसरा हप्ता हा एप्रिल महिन्यापरेंत  जमा होईल  असे सांगण्यात आले.  'शिष्यवृत्ती मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी याकरता उपाययोजना कराव्यात' असे आमदार रोहित पवार यांनी म्हंटले . याबाबतील लक्षवेधी सूचना सुलभा खोडके  व अमीन पटेल यांनी मांडली .

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीच्या आठ योजना सुरु आहेत. यामध्ये ऑनलाईन  अर्ज प्राप्त  होतील त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच अनेकदा अर्ज भरताना अनेक त्रुटी होत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागतो.यामुळे अनेकदा अर्जांची संख्या वाढलेली दिसते . वर्ष २०१९ -२०२० करीता ६८९.३८ कोटी रुपयांचा निधी पहिला हप्ता म्हणून देण्यात आला आहे परंतु दुसऱ्या हप्त्या करीत अर्थ संकल्पावर निर्भर राहावे लागते, असे वडेट्टीवार म्हणाले .

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News