तरुणाने पदव्युत्तर परीक्षेत पटकावले सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

ॲकसेन्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल व्होरा यांच्या हस्ते सुवर्णपदक व चषक देऊन त्याला गौरविण्यात आले.

धायरी : फर्ग्युसन रस्त्यावरील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (आयएमडीआर) महाविद्यालयात शिकणाऱ्या ओंकार दत्तात्रय पिसाळ याने व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले. आयएमडीआरमध्येच हा कार्यक्रम झाला. ॲकसेन्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल व्होरा यांच्या हस्ते सुवर्णपदक व चषक देऊन त्याला गौरविण्यात आले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे होते. ओंकारने व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवला म्हणून त्याला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. तो मूळचा जयसिंगपूर येथील आहे.  नोकरीच्या मागे न लागता यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न मला साकार करायचे आहे. माझ्या या यशामध्ये आई वडील, आजोबा आजी यांच्यासह सर्व गुरुजनांचा वाटा असल्याचे त्याने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News