गोल्डन डायमंड मार्शल आर्टच्या १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

रविवारी  नेरूळ येथील आगरी-कोळी संकुलात फना कोशी राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

वाशी : नेरूळ येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईतील गोल्डन डायमंड मार्शल आर्टच्या १२ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, तर १२ विद्यार्थ्यांनी रौप्य व कांस्यपदक मिळवीत राष्ट्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटविला. या विद्यार्थ्यांनी आजवर राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविली आहेत.

रविवारी  नेरूळ येथील आगरी-कोळी संकुलात फना कोशी राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी जपान येथून आलेले ग्रॅंडमास्टर केविन फनाकोशी उपस्थित होते.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या गोल्डन डायमंड मार्शल आर्टच्या साहिल पात्रा, गणेश नाईक, आयर्न भोसले, अनिल गुप्ता, विहान अहेर, आबिर चॅटर्जी, आर्या वऱ्हाडी, रुची पाटील, जान्हवी माने, तनय राठोड, साईराज राजपुरे, साई ढोरे यांनी सुवर्णपदक; तर सुनील गुप्ता, निखिल घागरे, अक्षत नायर, रिद्धी कनखरी, सोहम सरफरे, तनीष पिंगळे यांनी रौप्यपदक पटकाविले. सोहम सरवणकर, अथर्व शेंडगे, स्पर्श मोरे, रुचिता परबत, श्रीषा सनस, तन्वी वाघ यांनी कांस्यपदकावर नाव कोरले. या खेळाडूंना संस्थेचे ग्रॅंडमास्टर आप्पा चिकणे, शिहान शिवाजी ढवळे, सायली सरवणकर आदींचे मार्गदर्शन लाभले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News