जीएमसीची वाढत्या कर्करोगासाठी जनजागृतीपर रॅली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थी परिषदेच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेल, मनोरंजन, क्रीडा स्पर्धा यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जातात.

अकोला : लहानमुलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेकडून सोमवारी  महाविद्यालयातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. दरम्यान अधिष्ठाता डॉ.शिवहरी व्ही. घोरपडे यांनी रॅलीला मार्गदर्शन करून कर्करोगाची लक्षणं, निदान या बद्दल माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थी परिषदेच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेल, मनोरंजन, क्रीडा स्पर्धा यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जातात.

याचाच एक भाग म्हणून नुकताच जागतिक लहान मुलांमधील कर्करोग हा दिवस जगभर पाळण्यात आला. जगभरात दरवर्षी एकोणवीस वर्षांखालील तीन लाख कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. यासंदर्भातील माहिती पालकांना व्हावी त्यातून वेळेत निदान व्हावे यासाठी ही जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती. निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे, अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे, विद्यार्थी परिषदचे प्रभारी प्रमुख डॉ.रमेश पवार, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनेश नैताम,विद्यार्थी प्रतिनिधी प्रमुख आदित्य लांडे यांच्यासह विविध विभागाचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News