हिंगोलीमध्ये विद्यार्थीनीची सुरक्षा वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

दिवसभरात १५० पेक्षा अधिक बसेसच्या फेऱ्या असल्याने दर दिवशी पाच हजार प्रवाशांची ये-जा असते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले पोलिस मदत केंद्र नावालाच ठेवले आहे. मात्र, या ठिकाणी एकही पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्याने विद्यार्थिनी व प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

हिंगोली : येथील मध्यवर्ती बसस्थानकात ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे रोडरोमिओंसह पाकीटमार सक्रीय झाल्याने
प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. येथे पोलिस चौकी असून ती केवळ नावालाच आहे. 

ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. मानव विकासच्या २१ बसेस सेनगाव, औंढा, कळमनुरी भागात विविध मार्गांवर धावत असतात. या बसमधून सुमारे एक हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात. दिवसभरात १५० पेक्षा अधिक बसेसच्या फेऱ्या असल्याने दर दिवशी पाच हजार प्रवाशांची ये-जा असते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले पोलिस मदत केंद्र नावालाच ठेवले आहे. मात्र, या ठिकाणी एकही पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्याने विद्यार्थिनी व प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे बसमध्ये चढ - उतार करताना अनेक प्रवाशांची पाकिटे तसेच बसस्थानकात उभ्या असलेल्या महिला प्रवाशांचे दागिने चोरट्याने पळविल्याच्या घटना घडल्या आहेत.

मात्र या ठिकाणी अनेक महिन्यांपासून पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या शाळकरी मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांत वाढ होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन बसस्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. बसस्थानकाकडे पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रोडरोमिओ व पाकीटमार सक्रीय झाले आहेत. सध्या तर मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनासने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतून केली जात आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News