खडकीमध्ये रंगले माजी विद्यार्थ्यांचे गेट-टूगेदर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

 समाजात अजूनही काही रूढी, परंपरा आहेत. त्यातून आजच्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी त्यांच्यात क्रांती घडविणे गरजेचे आहे.

रेंजहिल्स :  समाजात अजूनही काही रूढी, परंपरा आहेत. त्यातून आजच्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी त्यांच्यात क्रांती घडविणे गरजेचे आहे. विशेषत: गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. त्यांनाही विकासाच्या प्रक्रियेत स्थान देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा पक्का निर्धार या वेळी माजी विद्यार्थ्यांनी केला.

खडकी येथील आलेगावकर उच्च माध्यमिक विद्यालयातील १९८३ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ३७ वर्षांनंतर टिकाराम जगन्नाथ कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये आयोजिला होता. त्या वेळी माजी विद्यार्थ्यांनी हा संकल्प केला. कार्यक्रमासाठी विजय दळवी, जयंत येलुलकर, सुरेश एडवे, दत्ता ढवळे आदींचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॉ. निशा भंडारे, दत्ता सूर्यवंशी यांनी केले. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News