नीट प्रवेश चाचणीसाठी 'या' चार संस्था एकत्र येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020
  • एनटीएतर्फे घेण्यात येणाऱ्या नीटच्या स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि यशस्वी होण्यासाठी नियोजन यावर अवलंबून असते.

नागपूर : अभ्यासासाठी उत्तम वातावरण, अभ्यासपूर्ण धोरणासोबतच सर्वोत्तम शिक्षकांची आवश्‍यकता असते. या सर्वच गोष्टी एका ठिकाणी मिळणे कठीण असल्याने आयकॅड, फाले, तेलंग आणि प्रधान या शिक्षकांच्या संस्थानी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात्तम वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी (नीट) शैक्षणिक केंद्र बनविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयकॅडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सारंग उपगनलावार, डॉ. समिर फाले आणि पाणीनी तेलंग यांनी पत्रकारांना दिली. 

कोचिंग क्‍लासेसमध्ये एक अथवा दोन शिक्षकच चांगले असतात. इतरांच्या शिकवण्यात उणीवा दिसतात अशी तक्रार विद्यार्थी आणि पालकांकडून कायम करण्यात येत असते. अभ्यासक्रमातून सर्वच विषय शिकविण्यात येत असले तरी ते समजत नाहीत. पालक आपल्या पाल्यांना अशा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देतात तेथील शिक्षकांची नावेही माहीत नसते. अथवा त्यांच्या शिकविण्याची पद्धतही विद्यार्थ्यांच्या पचनी पडत नाही.

एनटीएतर्फे घेण्यात येणाऱ्या नीटच्या स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि यशस्वी होण्यासाठी नियोजन यावर अवलंबून असते. या क्षेत्रात आपला ठसा उमटविलेल्या येथील आयकॅड, फाले सर, तेंलग सर आणि प्रधान मॅडम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थानी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

विदर्भातील विद्यार्थ्यांची नीटच्या प्रवेश चाचणी परीक्षेत उत्तम कामागिरी करावी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्याचे स्वप्न मनात बाळगून, प्रचंड परीश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही संस्था प्रमुख्यांने काम करणार आहे. या संस्थेत अतिशय वाजवी दरात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येणार आहे. संस्थेचे प्रशिक्षण लक्ष्मी नगरातील लोकमान्य टिळक भवन येथे घेण्यात येणार आहेत.

नीटच्या बॅचमध्ये दररोज भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्राचे वर्ग, सराव परीक्षा, त्यानंतर थ्री डी तंत्रज्ञान व्हिडीओ लेक्‍चरर्स व विद्यार्थ्यांच्या संकल्पना मजबूत बनविता येणार आहे. तसेच अध्यायनानिहाय गटवार आणि चाचणी मालिका घेण्यात येणार आहेत असेही डॉ. मनिषा प्रधान यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News