भीतीपोटी तिने टॉयलेटमध्येच दिला बाळाला जन्म

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

साक्री शहरातील एका वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला प्रसूतीच्या कळा आल्या. त्या वेळी तिने गुपचूपपणे टॉयलेटमध्ये जाऊन स्वतःच प्रसूती करून घेतली.

धुळे  : साक्री शहरातील एका वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला प्रसूतीच्या कळा आल्या. त्या वेळी तिने गुपचूपपणे टॉयलेटमध्ये जाऊन स्वतःच प्रसूती करून घेतली. हा प्रकार समजू नये म्हणून नवजात बाळाला टॉयलेटमधील बादलीमध्ये टाकले आणि ती पुन्हा खोलीत येऊन झोपल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

साक्री शहरात आदिवासी मुलींसाठी सावित्रीबाई मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात सदरचा प्रकार घडला असून, बाळाला जन्म देणारी ती युवती आणि बाळ यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतका मोठा प्रकार घडेपर्यंत वसतिगृहातील अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची माहिती मिळत नसल्याने वसतिगृहाचा अनागोंदी प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

वसतिगृहात एफवायबीएमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अठरावर्षीय मुलीने वसतिगृहाच्या टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली. जन्म देऊन मुलीने बाळ तिथेच बादलीमध्ये सोडून दिले व भीतीपोटी पुन्हा मुलींमध्ये येऊन झोपी गेली. मात्र, बाळाच्या रडण्याचा आवाजाने वसतिगृहाच्या वार्डन यांनी बाळाच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता बादलीत बाळ पालथे पडलेले आढळून आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News