राज्यशासनाकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

शिक्षण विभागाने काही शाळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळा’ची स्थापना केली होती. मात्र, या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाविषयी अनेक गंभीर तक्रारी  आहेत. सदस्य विलास पोतनीस यांनी या विषयावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना प्रा. गायकवाड यांनी उपरोक्त माहिती दिली.
राज्यात आदर्श ठरलेली वाबळेवाडी शाळा पालक- ग्रामस्थांना भावली, याचे महत्त्वाचे कारण आंतरराष्ट्रीय बोर्ड हेही आहे. सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक असून, आता आम्ही आमची शिक्षण पद्धती ठरवू आणि सरकारला त्यांचा निर्णय कसा चुकीचा आहे, ते दाखवून देऊ.
- सतीश वाबळे,
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वाबळेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे

मुंबई : राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान, गुणवत्तापूर्ण आणि आजच्या काळाशी समर्पक असे शिक्षण मिळावे, ही राज्यशासनाची भूमिका असल्याने राज्य सरकारचे एकच शिक्षण मंडळ यापुढे असेल. त्यामुळे मागच्या सरकारने स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रणजित पाटील यांनी याविषयी चर्चा करून या अभ्यासक्रमातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली. राजकीय आकसाने निर्णय घेऊ नये असा आग्रह विरोधकांनी केला. मात्र, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्यावर शिक्षणमंत्री ठाम राहत त्यांनी विरोधकांची मागणी फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News