रोजगार मेळाव्यातून तरूणांना नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020

युवक-युवतींसाठी घेतलेल्या रोजगार मेळाव्यात कर्जत तालुक्‍यातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

नेरळ : विद्यार्थ्यांना नोकरीसाठी फिरावे लागू नये, यासाठी कर्जत येथील इंग्लिश माध्यमिक शाळेत रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बॅंकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी पात्र ठरलेल्या तरुणांना अंतिम मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहे.

उच्च शिक्षण घेऊन वणवण फिरूनही तरुणांना नोकरी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन कर्जत इंग्लिश माध्यमिक शाळा आणि कॉम्प्टेक कम्प्युटर यांच्या माध्यमातून रोजगार मेळावा घेण्यात आला. रोजगार मेळाव्याचे उद्‌घाटन केईएस शिक्षण संस्थेचे विश्वस्त सतीश पिंपरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कॉम्प्टेक कम्प्युटर्सचे प्रमुख जितेंद्र माळी, संचालक प्रिया माळी आदींसह शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी साळोखे उपस्थित होत्या.

रोजगार मेळाव्याच्या सुरुवातीला आयोजक सतीश पिंपरे यांनी आपले तरुण उच्च शिक्षण घेऊनही त्यांना नोकरी मिळत नाही. कर्जतच्या बाहेर मुलाखतीसाठी गेल्यास निवड होत नाही. त्यामुळे त्यांचा पैसेही खर्च होत असतो. या परिस्थितीचा विचार करून गरीब गरजू विद्यार्थ्यांना नोकरीची गरज जाणवत असते. त्याचा विचार करून आम्ही कॉम्प्टेक कम्प्युटर एज्युकेशन कर्जत यांच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याची संकल्पना स्पष्ट केली. 

युवक-युवतींसाठी घेतलेल्या रोजगार मेळाव्यात कर्जत तालुक्‍यातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी मुंबईकडून मॉडेल करिअर सेंटर आणि कॉन्फडेरेशन ऑफ इंडिअन इंडस्ट्रीचे कौन्सिलिंग प्रमुख पारुळ तिलसारा, प्रकल्प समन्वयक सुनील यादव, तसेच कंपनीचे एचआर उमेश जिनवाल आले होते. ज्याप्रमाणे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मुलाखती घेतल्या जातात, त्याच धर्तीवर वातावरण कर्जतमध्ये तयार झाले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News