संभाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे व उपसभापती दमयंती जाधव यांचा डॉ. कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भोर : ‘‘भोरमधील लोकप्रतिनिधींनी स्वराज्याच्या रक्षणासाठी कसे जगावे, याची शिकवण देणारे छत्रपती संभाजी महाराज आणि शरद पवारांसारख्या ७९ वर्षांच्या तरुणाच्या इच्छाशक्तीची प्रेरणा घ्यावी,’’ असे मत अभिनेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे व उपसभापती दमयंती जाधव यांचा डॉ. कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शेतकरी मेळावाही घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

येथील यशवंत लॉन्समध्ये मंगळवारी झालेल्या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, महिलाध्यक्षा विद्या यादव, शहराध्यक्ष नितीन धारणे, युवा नेते विक्रम खुटवड, जिल्हा बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, सुनील चांदेरे, यशवंत डाळ, लहू शेलार, वंदना धुमाळ, हसीना शेख, मनोज खोपडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारमूर्ती रणजित शिवतरे, श्रीधर किंद्रे व दमयंती जाधव यांनी आपल्या कामातून जनतेला न्याय देऊ असे सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले, की ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघातील ९० टक्के अंगणवाड्यांना वीज व पाण्याची सोय करण्यात आली आहे. रायरेश्वरचा पर्यटनविकास करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. शिक्षकांनाही पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे.’’ विठ्ठल दानवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News