दहावी, बारावीच्या परिक्षेसाठी शिक्षण मंडळ तयारीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020

नागपूर विभागाचा दहावी-बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा यंदा दीड लाखाच्या पार गेला आहे. 

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाद्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळाची जवळपास पूर्ण  तयारी झालेली आहे. यावर्षी नागपूर विभागाचा दहावी-बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा यंदा दीड लाखाच्या पार गेला आहे. दहावीत १ लाख ८७ हजार ७९७ विद्यार्थ्यांचा समावेश असून बारावीत १ लाख ६८ हजार ५०८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा ३ ते १३ मार्चदरम्यान होणार आहे. यावर्षी बारावीला १ लाख ६८ हजार ५०८ विद्यार्थांनी नोंद केली आहे. विभागात एकूण ४७५ परीक्षा केंद्राहून विद्यार्थी परीक्षा देणार असून परिरक्षकांची संख्याही ८४ असणार आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा बारावीत १५ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दहावीची  परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च दरम्यान होणार आहे. 
यंदा विभागातून दहावीसाठी १ लाख ८७ हजार ७९७  विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. विभागात ६९२ परीक्षा केंद्राहून दहावीची परीक्षा विद्यार्थी देणार आहेत. विभागात एकूण ८४ परिरक्षक असणार आहेत. यावेळी दहावीच्या २५ हजार ८७४ विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. एकूण दोन्ही परीक्षेत एकूण ३ लाख ५५ हजार ३०५ विद्यार्थी दहावी-बारावीची परीक्षा देणार आहेत. 

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा शनिवारपासून 

बारावीच्या लेखी परीक्षांचा विचार करता प्रात्यक्षिक परीक्षांचेही वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच होणार आहेत. एक फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत या परीक्षा उच्च माध्यमिक हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजांना घेता येणार आहेत. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक १५ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत आहे. परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक असल्याने लेखी परीक्षेसह प्रात्यक्षिक परीक्षांचीही तयारी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.

बारावी परीक्षार्थी

      

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News

     जिल्हा    नियमित विद्यार्थी परीक्षा केंद्र
भंडारा  १८,६४४   ६२
चंद्रपूर     ३०,७९८  ८१
नागपूर  ६५४८४  ८२   
वर्धा १८३३८   ५०  
गडचिरोली                         १३९५५           ४८
              गोंदिया    २१४६९  ७४