सुट्टीमुळे विद्यार्थ्यांची वाचनाकडे अोढ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून, पर्यटनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • त्यामुळे मुलांना घरी बसावे लागत आहे.

मुंबई : देशात वेगाने वाढणाऱ्या  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये शाळांना सुटी देण्यात आली, त्यामुळे बहुतेक विद्यार्थी शालेय अभ्यास पूर्ण करण्याबरोबर अवांतर वाचन करण्यावर भर देत असून, कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत, असे ‘ब्रेनली’ने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात समोर आले आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून, पर्यटनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मुलांना घरी बसावे लागत आहे. या परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रावर झालेल्या परिणामांचा शोध घेण्यासाठी ‘ब्रेनली’ या शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीने सर्वेक्षण केले. 

ॲपद्वारे झालेल्या या पाहणीत दोन हजारांहून अधिक मुले सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वेगवेगळ्या संस्था डिजिटल शिक्षणावर भर देत आहेत. सर्वेक्षणात सहभागी  झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३६ टक्के जणांनी आपण घरी राहून ऑनलाइन शिक्षण घेत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे ३४ टक्के विद्यार्थ्यांनी सुटीचा कंटाळा आल्याचेही सांगितले. शिक्षक फोनवरून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांना मदत करत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News