कोरोनामुळे वर्ल्ड रेसलिंग स्पर्धा प्रेक्षंकाविना ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट’ हा जगातील लोकप्रिय फाइटिंग शो म्हणून ओळखला जातो.
  • स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक स्टेडिअममध्ये हजेरी लावतात.

नवी दिल्ली : ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट’ हा जगातील लोकप्रिय फाइटिंग शो म्हणून ओळखला जातो. स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक स्टेडिअममध्ये हजेरी लावतात. मात्र, कोरोना विषाणूचे संकट टळेपर्यंत प्रेक्षकांना ही स्पर्धा स्टेडिअममध्ये जाऊन पाहता येणार नाही.

स्पर्धकांना रिकाम्या खुर्च्यांसमोर स्पर्धा खेळावी लागत आहे, त्यामुळे प्रेक्षकांशिवाय ते आपला सर्वोत्कृष्ट खेळ सादर करू शकत नाहीत. असे ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्स मॅकमोहन यांनी सांगितले. भारताप्रमाणेच अमेरिकादेखील करोना विषाणूमुळे त्रस्त आहे. अमेरिकेत १०० पेक्षा अधिक लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News