कोरोनामुळे 'ही' अभिनेत्री जोपासतेय चित्रकलेचा छंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चित्रीकरण बंद करण्यात आले आहे.
  • कलाकार चित्रीकरण नसल्याने घरी बसून आपले छंद जोपासत आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. कलाकार चित्रीकरण नसल्याने घरी बसून आपले छंद जोपासत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जिव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेत्री शर्वरी जोगही चित्रीकरण बंद असल्याने ती घरी चित्र काढून आपला आवडता छंद जोपासत आहे.

‘मी जीडी आर्ट केले आहे आणि मी एक कमर्शिअल आर्टिस्ट आहे. चित्रीकरणादरम्यान मला चित्र काढायला वेळ मिळत नाही. तरीही माझ्या जवळ नेहमीच माझी स्केच बुक असते. चित्रीकरणातून थोडा वेळा मिळाला की मी चित्र काढते. आता चित्रीकरण बंद असल्याने मला चित्र काढण्यासाठी भरपूर वेळा मिळाला आहे. आणि आता मी मनसोक्‍त चित्र काढणार आहे,’ असे शर्वरी सांगते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News