डॅा. पल्लवी यांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

हैदराबादमध्ये अपोलो कर्करोग संस्थेत १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. खुरूद यांनी सहभाग घेतला.

तुळजापूर : येथील डॉ. पल्लवी उदय खुरूद यांची युरोपमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये अपोलो कर्करोग संस्थेत १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. खुरूद यांनी सहभाग घेतला.

या परिषदेत देशभरातील १५० कर्करोगतज्ज्ञ सहभागी झाले होते. डॉ. खुरूद यांच्या सेमिनारला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. अपोलो कॅन्सर संस्थेने युरोपमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी तिला प्रायोजकत्व जाहीर केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News