ऑलिंपिक घेऊन आमचा जीव धोक्‍यात आणू नका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020

पान सरकार; तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती टोकियो ऑलिंपिक पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसारच होईल याची ग्वाही देत आहे; पण जपानवासींचा स्पर्धेसाठी असलेला विरोध वाढत आहे. ऑलिंपिक घेऊन आमचा जीव धोक्‍यात आणू नका, असे जपानवासींचे मत होत आहे. 

टोकियो : जपान सरकार; तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती टोकियो ऑलिंपिक पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसारच होईल याची ग्वाही देत आहे; पण जपानवासींचा स्पर्धेसाठी असलेला विरोध वाढत आहे. ऑलिंपिक घेऊन आमचा जीव धोक्‍यात आणू नका, असे जपानवासींचे मत होत आहे. 

जपानचे पंतप्रधान शिंझो अबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख थॉमस बॅश हे टोकियो ऑलिंपिक २४ जुलैपासून सुरू होईल, अशी ग्वाही देत आहेत. मात्र जगातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा लांबणीवर पडत आहेत. जपानमधील क्रीडा स्पर्धांनाही स्थगिती देण्यात आली आहे. या परिस्थितीत ऑलिंपिकचा धोका कशाला, अशी विचारणा जपानवासी करीत आहेत. 

‘‘समजा, जपानमधील कोरोना पूर्ण आटोक्‍यात आला, तरी जगभरात हीच स्थिती असेल याची ग्वाही देता येत नाही. ऑलिंपिकच्या निमित्ताने जगभरातून लोक येणार. त्यामुळे पुन्हा धोका वाढू शकतो. या परिस्थितीत ऑलिंपिक न झालेले उत्तम’’, असे आयटी कंपनीत असलेल्या कोकी मिउरा याने सांगितले. 

जनमत चाचणीत ऑलिंपिकला ४५ टक्के जणांनी विरोध केला; तर ४० जणांनी संयोजनास सहमती दाखवली. यापूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणाच्या तुलनेत विरोध जास्त झाला आहे.  मॅसाओ सुगावारा या ९० वर्षांच्या बुजुर्गांनी ऑलिंपिक लांबणीवर टाकणेच सर्वांच्यासाठी योग्य; पण हा निर्णय खूपच त्रासदायक असेल, अशीही टिप्पणी केली. जपानमध्ये स्थायिक झालेले मुनफ्रेड ओट्टो हे वकील आहेत. त्यांनी कोरोना जूनपर्यंत रोखला गेला नाही तर स्पर्धा लांबणीवर टाकणे योग्य ठरेल, असे सांगितले. 

‘माझा मुलगा बेसबॉलचा चाहता आहे. त्याच्यासाठी मी सामन्यांची तिकिटे काढली आहेत. आम्हा दोघांना स्पर्धेचे वेध लागले आहेत’, असे हिसायो सुझुकी यांनी सांगितले; पण त्याच वेळी सध्याची परिस्थिती पाहता स्पर्धा लांबणीवर गेली तर चांगले होईल, असे खेदपूर्वक त्यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News