'या' जिल्ह्यात होतोय शिक्षणात भेदभाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

येवला : चार-पाच वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे फॅड जिल्ह्यात निर्माण झाले होते. त्या वेळी अनेकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलांना काढून इंग्रजी मीडियमच्या शाळेत पाठविल्याने जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. मुलाला इंग्लिश मीडियममध्ये किंवा खासगी, मोठ्या अन्‌ शहरातील शाळेत प्रवेश, तर मुलगी गावातील झेडपीच्या शाळेतच बरी... या पालकांच्या धोरणामुळे ही तफावत दिसत असल्याचे चित्र आहे.

सद्यःस्थितीत गल्लीबोळात आणि खेड्यापाड्यात इंग्लिश मीडियमचे जाळे पसरले आहे. याची सुरवात चार-पाच वर्षांपूर्वी झाली, त्या वेळी पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून काढून इंग्लिश मीडियमला टाकण्याचा सपाटाच लावला होता. मात्र मागील चार-पाच वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळांनीदेखील लोकवर्गणीतून कात टाकली आणि शिक्षकांच्या मेहनतीतून गुणवत्तादेखील वाढली आहे. याचमुळे की काय पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळा पालकांच्या मनात घर करीत आहेत.

त्यामुळे आजचा पहिली-दुसरीचा पट बघितला तर मुलांची संख्या नक्कीच मुलींच्या तुलनेत अधिक आहे. अर्थात हेच प्रमाण सर्वच वर्गांत टिकून असते. साधारणत: ६० ते ७५ टक्के मुले आणि २५ ते ४० टक्के मुली असे सर्व वर्गांचे प्रमाण असते. मात्र चार-पाच वर्षांपूर्वी पहिलीच्या वर्गातील मुले आता सहावी ते आठवीच्या वर्गात शिकत असून, या वर्गांचे आकडे जाणकारांना चकविणारे आहेत. 
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या वर्गांची संख्या बघितल्यास मुलांची संख्या कमी आणि मुलींची जास्त, असे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यातील झेडपी शाळांमधील स्थिती

  वर्ग  मुले   मुली
 पहिली  २६,५६४    २५,५५९
 दुसरी   २६,३०४   २५,०५४
 तिसरी २७,७५६    २५,९३४
 चौथी  २८,०४०     २६,६६९
 पाचवी ११,४८२  ११,५३९
 सहावी   ९,७०१   ९,९०२
 सातवी  ९,२५७  ९,४५६
 आठवी  १,७०५   १,७१४
एकूण   १,४०,८०८  १,३५,८३१

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News