बंद ग्रंथालयांमुळे गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020
  • राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये, संशोधन संस्थांनी चालवलेली शासनमान्य ग्रंथालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व ग्रंथालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाने घेतला आहे. 

राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये, संशोधन संस्थांनी चालवलेली शासनमान्य ग्रंथालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

या कालावधीत ग्रंथालयांकडून अधिवेशन, कार्यशाळा, चर्चासत्र, ग्रंथोत्सव आदी कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, या सूचना सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांच्या कार्यालय प्रमुखांचे कार्यालयातील दैनंदिन कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे, परंतु ग्रंथांची देवाण-घेवाण, ग्रंथालय सेवा, अभ्यासिका व वाचन कक्ष ३१ मार्चपर्यंत बंद ठेवावेत अशी सूचना दिली आहे.

एशियाटिक सोसायटीनेही ३१ मार्चपर्यंत ग्रंथालय बंद ठेवले असून तेथील कार्यशाळा, व्याख्यान आणि अन्य कार्यक्रमही रद्द केले आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सर्व शाखा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अभ्यासिकाही बंद ठेवल्या आहेत.

ऐन परीक्षेच्या काळात अभ्यासिका बंद झाल्याने गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेत सुमारे १५० विद्यार्थी; तर दादर पश्‍चिम येथील शाखेत १०० हून अधिक विद्यार्थी अभ्यास करतात.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News