राज्यात सुट्टी घोषित करूनही 'हे' महाविद्यालय अजून सुरूच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020
  • उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालये आणि शाळांना सुटी दिली.

नागपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालये आणि शाळांना सुटी दिली. तसेच विद्यापीठांच्या परीक्षाही थांबविल्यात. मात्र, राज्यातील सामाजिक न्याय विभागाला कोरोनाची दहशत अद्यापही वाटत नसल्याने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेले समाजकार्य महाविद्यालयांना बंद ठेवण्याचे आदेश अद्याप काढले नसल्याचे समजते. त्यामुळे मंगळवारीही समाजकार्य महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना उपस्थित रहावे लागले.  

राज्यातील सर्व महाविद्यालये ही उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. मात्र, समाजकार्य महाविद्यालये ही सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे सुटीसंदर्भातही समाजकार्य महाविद्यालयांसाठी सामाजिक न्याय विभागाने मार्गदर्शक परिपत्रक काढणे आवश्‍यक आहे. मात्र, नेहमीप्रमाणे सामाजिक न्याय विभागाने समाजकार्य महाविद्यालयांकडेही दुर्लक्ष केले असून कुठलेच पत्रक काढले नसल्याने राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालये मंगळवारीही सुरूच होती.  

प्राध्यापकांनीच मागणी केली

समाजकार्य महाविद्यालये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्या सुटीसंदर्भात स्वतंत्र परिपत्र काढणे आवश्‍यक होते. मंगळवारी काही समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मागणी केली. आता कुठे सामाजिक न्याय विभाग सुटीसंदर्भात मार्गदर्शन करणारे परिपत्र काढणार असल्याची माहिती आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News