परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रावर शिक्षण विभागातर्फे कठोर पाऊले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

यंदा औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद व हिंगोली अशा पाच जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेला ६२४ केंद्रांवरून दोन लाख एक हजार ५७२ विद्यार्थी प्रविष्ट झालेआहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी परीक्षेच्या उत्कृष्ट संचालनासाठी खास उपाययोजना करण्याबाबत केंद्र संचालक, पर्यवेक्षक, पालक, विद्यार्थी यांना सूचना दिल्या आहेत.

औरंगाबाद : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात अर्धा तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

यंदा औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद व हिंगोली अशा पाच जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेला ६२४ केंद्रांवरून दोन लाख एक हजार ५७२ विद्यार्थी प्रविष्ट झालेआहेत. यामध्ये एक लाख १५ हजार पाच मुले तर ८६ हजार ५६७ मुलींचा समावेश आहे. यासाठी विभागात एकूण ६३ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रावर शिक्षण विभागातर्फे कठोर पाऊले उचलली जाणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी परीक्षेच्या उत्कृष्ट संचालनासाठी खास उपाययोजना करण्याबाबत केंद्र संचालक, पर्यवेक्षक, पालक, विद्यार्थी यांना सूचना दिल्या आहेत.

गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसेल. त्या बैठे पथकात कमीत कमी चार सदस्य असतील. त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधूनफेरी मारतील. दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारात ‘वॉच’ ठेवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकांच्या निदर्शनासआणतील़ व आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्तअसेल. 

भरारी पथक सज्ज

दहावी परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीची असेल. जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासन, शिक्षण विभागपरीक्षा पारदर्शक व भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी सज्ज असणार आहेत. दक्षता समितीत अध्यक्ष जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, शिक्षणाधिकारीप्राथमिक, माध्यमिक, निरंतर यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर दक्षता समितीत उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार, गटविकास अधिकारी व सदस्य सचिवगटशिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार आहे.

समुपदेशकांची नियुक्ती 

विभागीय मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुपदेशकांना सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीतच संपर्क साधावा.विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधी प्रश्न आदींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये.
- संपर्क क्रमांक - २३३४२२८, २३३४२८४, २३३१११६ (०२४०), ९४२१३३६८०१, ९४०४५२६०३६.

मोबाईलला बंदी

परीक्षा केंद्रावर केवळ केंद्र संचालक, कस्टोडियन, सहायक केंद्र संचालक हेच मोबाईलचा वापर करू शकतात, तर अन्य कोणी मोबाईलचा वापर करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा  परीक्षा केंद्र  परिरक्षक केंद्र  विद्यार्थी
औरंगाबाद    २२२      २०      ६९,७०६
बीड        १५६ १६  ४६,५३६
जालना  १००      ११ ३५,१०१
परभणी        ९३           १०  ३१,९५६
हिंगोली ५३  ७     १८,२७३
एकूण  ६२४  ६३         २,०१,५७२

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News