दिपक डंबाळे ठरला 'रॉयल श्री दिंडोरीचा' मानकरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

आंतरराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे-पाटील, शिवा वगळ, दिव्यांग स्पर्धेचे रौप्यपदक विजेता मयूर देवरे यांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

नाशिक : येथील नाशिक बॉडीबिल्डिंग ॲन्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने दिंडोरीच्या रॉयल फिटनेस क्‍लबतर्फे झालेल्या रॉयल श्री दिंडोरी शरीरसौष्ठव स्पर्धेत दीपक डंबाळे याने ‘रॉयल श्री दिंडोरी’ किताब पटकावला. विजेतेपदासह ११ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन दीपकला गौरविण्यात आले. 

दरम्यान, या स्पर्धेत बेस्ट पोझरसह पाच हजारांचे रोख पारितोषिक नाशिकच्याच नितीन बागूल याने पटकावले. मोस्ट इम्प्रूव्हड बॉडीबिल्डरचे तीन हजारांचे पारितोषिकही नाशिकच्याच साकीब शेख याने पटकावले. सात वजनगटांत झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना खासदार हेमंत गोडसे, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हेल्थ ॲन्ड मोरचे धनंजय काळे, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, नगराध्यक्ष कैलास मवाळ, डॉ. मयूर पाटील, आबासाहेब तांबे आदींच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे-पाटील, शिवा वगळ, दिव्यांग स्पर्धेचे रौप्यपदक विजेता मयूर देवरे यांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. राजेंद्र सातपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. गुणलेखक म्हणून किशोर सरोदे यांनी, पंच म्हणून हेमंत साळवे, प्रकाश दाभाडे, नदीम खान, संजय जाधव, सागर येवले आणि स्टेज मार्शल म्हणून मिलिंद रहाणे यांनी जबाबदारी सांभाळली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News