आयसीएसई, आयएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • १९ ते ३१ मार्च या कालावधीत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
  • मंडळाने परिपत्रक जाहीर करून परीक्षांचे वेळापत्रक ३१ मार्चनंतर नव्याने जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

मुंबई : कोरोना विषाणू देशभरात वेगाने पसरत असल्याने सीबीएसई मंडळानंतर ‘काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टीफिकेट एक्‍झामिनेशन बोर्डा’ने दहावी (आयसीएसई) व बारावीच्या (आयएससी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. १९ ते ३१ मार्च या कालावधीत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मंडळाने परिपत्रक जाहीर करून परीक्षांचे वेळापत्रक ३१ मार्चनंतर नव्याने जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्गामुळे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सीबीएसई आणि सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News