बॅाक्सर सुमित सांगवानवरील एका वर्षाची बंदी उठविण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

सुमीतची चाचणी ऑक्‍टोबरमध्ये झाली होती. बंदी रद्द झाली असली, तरी त्याला त्यामुळे ऑलिंपिक पात्रता चाचणी स्पर्धेस मुकावे लागले

नवी दिल्ली : माजी आशियाई रौप्यपदकविजेता बॉक्‍सर सुमीत सांगवान याच्यावरील एका वर्षाची बंदी उठविण्याचा निर्णय राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने घेतला आहे. बंदी घातलेले उत्तेजक कोणत्याही हेतूने घेतले नव्हते, हा सुमीतचा दावा मान्य करण्यात आला. सुमीतवर डिसेंबरमध्ये एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय झाला होता.

त्याच्या चाचणीत आढळलेले उत्तेजक हे बंदी घातलेले होते. त्याचा उपयोग उत्तेजक चाचणीत सापडू नये, यासाठी केला जातो. त्यामुळे त्याचा बंदी घातलेल्या उत्तेजकात समावेश आहे. सुमीतची चाचणी ऑक्‍टोबरमध्ये झाली होती. बंदी रद्द झाली असली, तरी त्याला त्यामुळे ऑलिंपिक पात्रता चाचणी स्पर्धेस मुकावे लागले. बंदी उठवल्यामुळे एक मोठे दडपण दूर झाले आहे. मी काहीही चुकीचे केले नसल्याची मला खात्री होती. निर्दोषत्व सिद्ध करू शकलो, याचे समाधान आहे, असे सुमीतने सांगितले. डोळ्यांना त्रास होत असल्यामुळे आपण डॉक्‍टरांचा सल्ला घेतला होता. त्यांनी सुचविलेले औषधच घेतले होते, असे सुमीतने चौकशीच्या वेळी सांगितले होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News