कर्णधारपदी डेव्हिड वॉर्नरची पुन्हा निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने २०१८ मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती; परंतु मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात त्यांचा महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईकडून पराभव झाला होता.

नवी दिल्ली : येत्या आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला बाजूला करून पुन्हा एकदा कर्णधारपदी डेव्हिड वॉर्नरची निवड केली आहे. २०१८ आणि २०१९ या दोन हंगामात विल्यमसन हैदराबादचा कर्णधार होता. चेंडू कुरतडल्याप्रकरणी वॉर्नरवर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा २०१८ मध्ये विल्यमसनला कर्णधारपदी प्राधान्य देण्यात आले होते.

विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने २०१८ मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती; परंतु मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात त्यांचा महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईकडून पराभव झाला होता. वॉर्नरने २०१५ ते २०१७ अशा तीन वर्षांत कर्णधारपद सांभाळले होते. त्यात २०१६ च्या स्पर्धेत विजेतेपदाचा करंडक उंचावला होता. वॉर्नरने ४५ सामन्यांत नेतृत्व करताना २६ सामने जिंकलेले आहेत, तर विल्यमनने ३६ पैकी १४ लढतींत विजय मिळवला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News