अपघात टाळण्यासाठी 'या' विद्यार्थ्यांनी केली ॲपची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

वाहनचालकाला अपघातप्रवण क्षेत्राची माहिती आधीच मिळाल्यास तो सावध होऊन आपोआप आपल्या वाहनाचा वेग कमी करेल. त्यामुळे अपघातप्रवण क्षेत्रात अपघात टाळण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईतील नागरिकांना या ॲपची मोठी मदत होईल. 

नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी डी. वाय. पाटील विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वाहनचालकांना अपघातप्रवण क्षेत्रापासून सावध करणारे मोबाईल ॲप सुरू केले आहे. ‘ड्राइव्ह सेफ-नवी मुंबई ट्रॅफिक पोलिस’ असे या ॲपचे नाव असून, मंगळवारी या त्याचे उद्घाटन करण्यात आले. रामराव आदिक संस्थेचे सहायक प्राध्यापक डॉ. अमित बर्वे यांच्या संकल्पनेतून या ॲपची निर्मिती करण्यात आली असून, या ॲपच्या वापरामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे.  

रस्ते अपघातांत अनेकांचा हकनाक बळी जातो. काहींना कायमचे अपंगत्व येते. त्यामुळे रस्त्यावरील पुढील धोकादायक परिस्थितीची माहिती देऊन, चालकाला आधीच सावध करणाऱ्या ॲपच्या निर्मितीची संकल्पना डॉ. अमित बर्वे यांनी पुढे आणली. यासाठी पोलिसांकडून त्यांना नवी मुंबईतील २५ अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती देण्यात आली. त्यानुसार ‘ड्राइव्ह सेफ-नवी मुंबई ट्रॅफिक पोलिस’ हे ॲप तयार केले. या ॲपचा वापर करण्यासाठी प्ले-स्टोअरवरून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News