कोरोना संशयित खेळाडूंचा क्रिकेट सामना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020
  • परदेशवारी करून पनवेलमध्ये परतलेल्या १६ क्रिकेटपटूंना ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे
  • पोलिस बंदोबस्त असतानाही, पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी क्रिकेट खेळू दिले

नवी मुंबई: परदेशवारी करून पनवेलमध्ये परतलेल्या १६ क्रिकेटपटूंना ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे; मात्र हे सर्व क्रिकेटपटू आज दिवसभर भवनाच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसून आले. विशेष म्हणजे या वेळी पोलिस बंदोबस्त असतानाही, पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी क्रिकेट खेळू दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

दुबई येथे क्रिकेट प्रीमियर लीग खेळण्यासाठी गेलेले पनवेल आणि उरणमधील काही खेळाडू शनिवारी (ता. १४) रात्री मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. पालिकेने त्यांना तत्काळ त्याच ठिकाणी ताब्यात घेतले. या सर्वांना विशेष बसने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यात आली.

या चाचणीत त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूचे कोणतेही लक्षणे दिसून आले नाहीत; मात्र खबरदारी म्हणून त्यांना खारघरच्या ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या देखरेखीसाठी कर्मचारी व बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News