विद्यार्थ्यांना दिले कोरोनाबाबतचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020
  • कडगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक अशोक निकम यांनी कोरोना आजाराची पार्श्‍वभूमी, त्याची लक्षणे आणि उपाययोजना याबाबतची सविस्तर माहिती दिली.

गडहिंग्लज : औरनाळ येथील पार्वती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कोरोना आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे अध्यक्षस्थानी होते. उमेश सावंत यांनी स्वागत केले.

कडगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक अशोक निकम यांनी कोरोना आजाराची पार्श्‍वभूमी, त्याची लक्षणे आणि उपाययोजना याबाबतची सविस्तर माहिती दिली. हा आजार संसर्गजन्य असल्याने विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.

आरोग्य सेविका एस. एन. कोळी, गणपती पाटील, बाळू कुंभार, विजयकुमार शेंडगे, आनंदा पन्नोरी, अनिल पोवार, सदाशिव लोखंडे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. अस्मिता सावंत हिने आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News