देशातील युवापिढीचे योगदान मोलाचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020
  • देशातील युवकांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी  च्या माध्यमातून देशाच्या संरक्षणाची जबबादारी उचलावी. देश सुरक्षित तर आपले घर सुरक्षित

परभणी : संपन्न व सुरक्षित राष्ट्र निर्माण करायचे असेल तर त्यासाठी देशातील युवापिढीचे योगदान मोलाचे ठरते. त्यासाठी देशातील युवकांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी  च्या माध्यमातून देशाच्या संरक्षणाची जबबादारी उचलावी. देश सुरक्षित तर आपले घर सुरक्षित हे ध्यानात असावे, असे आवाहन कर्नल सुभाष पोळ यांनी सोमवारी  केले.

भारतीय संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, परभणी व विश्वभारती अकॅडमी, पुणे  यांच्या वतीने ‘संरक्षण क्षेत्रातील संधी’बाबत सोमवारी चर्चासत्राचे आयोजन श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.

कार्यक्रमास विश्वभारती अकॅडमी पुणे येथील कर्नल सुभाष पोल, कर्नल रोहित तिवारी, आनंद होता, लायन्स क्लब परभणीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत मनियार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्या प्रिया ठाकूर, ओमी तलरेजा यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मुळे मुलांच्या शिक्षणासाठी मिळणाऱ्या सवलती आणि फायदे याबद्दल माहिती कर्नल सुभाष पोल यांनी दिली.प्राचार्य डॉ. जाधव यांनी पाल्यांना एनडीएमध्ये जाण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News