कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे मत्सोद्योगामध्ये मोलाचे योगदान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 8 March 2020
  • मत्स्य संवर्धनाबरोबरच पर्यावरण संवर्धन व सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत केले.

रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मत्स्योद्योगामध्ये मोठे योगदान दिले आहे. मत्स्य संवर्धनाबरोबरच पर्यावरण संवर्धन व सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत केले.

शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अथांग २०२० झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्सच्या (आयसीएआर) माजी संचालिका डॉ. इंदू सावंत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दबीर पठाण, मत्स्य अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मंगेश शिरधनकर उपस्थित होते. संमेलनात विविध गुणदर्शन, ‘संगीत वाद्यवृंद’ आणि श्रीमंत दामोदर पंत हे नाटक सादर झाले.

शॉटपूट प्रतीक यादव, साहिल तारी, अभिलाषा सोनावणे, प्राची चव्हाण, बुद्धिबळ तेजस तारी, आदित्य जगझाप, बॅडमिंटन सौरभ राऊळ, पुष्कर फणसळकर, स्त्री साक्षी केळकर, सुप्रिया मेश्रे, टेबल टेनिस शुभम माजिक, जीत म्हात्रे, स्त्री वैष्णवी कोळवणकर यांनी बक्षीसे मिळवली. नाटकाचे दिग्दर्शन डॉ. अनिरुद्ध अडसुळ, संगीत वाद्यवृंदचे आयोजन सुहास वासावे, विविध गुणदर्शनचे नियोजन डॉ. स्वप्नजा मोहिते आणि मनिषा सावंत, क्रीडा विभाग डॉ. अनिल पावसे, मिलिंद सावंत, श्रीकांत शारंगधर यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News