समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीग्रहण कार्यक्रमाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

पदवी ग्रहण समारंभ हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील परमोच्च क्षण असल्याचे मत प्राचार्य डॉ. अण्णासाहेब गोजे यांनी व्यक्त केले.

आळेफाटा : बेल्हे  येथे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या पदवीग्रहण समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या वेळी एकूण ११७ पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

बेल्हे येथे समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मिरवणूक काढण्यात आली. पदवी ग्रहण समारंभप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, इस्रोचे युवासंशोधक धनेश बोरा, खोडदच्या महादुर्बिण प्रकल्पाचे (जीएमआरटी) प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, प्रा. रतिलाल बाबेल, प्राचार्य डॉ. अण्णासाहेब गोजे, प्रा. राजीव सावंत, विभागप्रमुख प्रा. अमोल खतोडे, प्रा. अनुप पोलगव्हांडे, प्रा. निर्मल कोठारी, प्रा. प्रवीण सातपुते, प्रा. चेतन डोखे आदी उपस्थित होते.  

पदवी ग्रहण समारंभ हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील परमोच्च क्षण असल्याचे मत प्राचार्य डॉ. अण्णासाहेब गोजे यांनी व्यक्त केले. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. प्रदीप गाडेकर यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. अनुप पोलगव्हांडे यांनी केले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News