विद्यार्थ्यांसाठी केले ‘इमर्जिंग टेक्‍नोलॉजीज इन फूड प्रोसेसिंग आणि फूड पॅकेजिंग’ कार्यशाळेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच ‘इमर्जिंग टेक्‍नोलॉजीज इन फूड प्रोसेसिंग आणि फूड पॅकेजिंग’ या विषयावर दोन दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले

बारामती : ‘‘अन्नप्रक्रिया उद्योग तसेच अन्नतंत्रज्ञान हे विषय आता जागतिक पातळीवर महत्त्वाचे असून, विद्यार्थी यात आपले करिअर करू शकतात,’’ असे प्रतिपादन एसव्ही ग्रुप या कंपनीचे अध्यक्ष विकास दांगट
यांनी केले.

विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच ‘इमर्जिंग टेक्‍नोलॉजीज इन फूड प्रोसेसिंग आणि फूड पॅकेजिंग’ या विषयावर दोन दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली गेली. राज्यभरातून २५० विद्यार्थी यात सहभागी झाले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विकास दांगट यांनी ‘ग्लोबल वॉर्मिंग, ऑरगॅनिक फूड व वैयक्तिक स्वच्छता’ यावर मार्गदर्शन केले. विनय ओसवाल यांनी ‘अन्नप्रक्रिया व अन्नसुरक्षा’, डॉ. एम. एस. पार्थसारथी यांनी ‘अन्नप्रक्रियेत तंत्रज्ञानाचे महत्त्व’ याबाबत, डॉ. नयनसिंग ठाकूर यांनी ‘एक्‍सस्क्रूजन टेक्‍नॉलॉजीमध्ये उच्च दाब व उच्च तापमानाचा उपयोग करून विविध पदार्थ तयार’ करण्याबाबत माहिती दिली.

अविनाश वाघ, डॉ. रिजवान पिंजारी, प्रणव त्रिपाठी, प्रदीप शहा यांनी विविध विषयांबाबत सविस्तर माहिती दिली. रिअल डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज तुपे यांनी त्यांचा १२,००० रुपयांच्या नोकरीपासून ५५० कोटींच्या डेअरी व्यवसायापर्यंतचा स्वतःचा खडतर प्रवास कथन केला. याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त अँड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य लालासाहेब काशीद, नीलिमा पेंढारकर उपस्थित होते. सुजाता पाटील, दीपाली मोहिते, अमृता भाकरे, डॉ. तुषार बोरसे, शेखर फडतरे यांनी या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News