जिल्ह्यातील तरुणांसाठी टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

चिंचघरमधील धनंजय स्पोर्टस्‌ क्‍लबतर्फे होणाऱ्या या स्पर्धेचे उद्‌घाटन राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे यांच्या हस्ते होणार आहे. 

जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना उत्तम खेळ दाखवण्याची संधी देण्यासाठी चिंचघर येथील प्रियदर्शनी मैदानावर खासदार चषक रंगणार आहे. पालघर जिल्ह्यातील तरुणाई अगदी आतुरतेने वाट पाहत असणारी ही टेनिस क्रिकेट स्पर्धा आजपासून १० मार्चदरम्यान ६ दिवस होणार आहे. 

चिंचघरमधील धनंजय स्पोर्टस्‌ क्‍लबतर्फे होणाऱ्या या स्पर्धेचे उद्‌घाटन राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे यांच्या हस्ते होणारस्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ७१ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ४१ हजार व चषक, तृतीय पारितोषिक २१ हजार व चषक; तर चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक पटकावणाऱ्या संघांना उत्तेजनार्थ प्रत्येकी १५ हजार आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. 

या स्पर्धा वाडा क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार खेळवल्या जाणार आहेत. सहा दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या महासंग्रामाचा आनंद लुटण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक, भाजपचे युवा नेते व माजी उपसभापती मंगेश पाटील यांनी केले आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News