गिर्यारोहकांनी सर केली लिंगाणा मोहिम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020
  • लिंगाणा सुळका चढाईच्या अवघड मोहिमेत पूर्ण काळजी घेतली.
  • मोहिमेत ट्रेक किंवा गिर्यारोहणाचा फारसा अनुभव नसलेले ५ सदस्यही होते.

१६ जणांचा समावेश; आव्हानात्मक मोहीम; रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा लिंगाण्यावरील चढाई ही पुण्याच्या मोहरी गावातून होते. परंतु रत्नागिरीकरांनी त्याच्या उलट बाजूच्या पाने गावातून चढाईचा मार्ग निवडला. बोराट्याची नाळ या अवघड वाटेतून मजल दरमजल करत सर्व जण लिंगाण्याच्या बेस कॅम्पला सकाळी पोहोचले. मुरबाड येथील दीपक विशे, कुसुम विशे व त्यांचे दोन सहकारी, राजेश नेने, आकाश पालकर व गावातील बबन कडू यांनी नारळ देऊन मोहिमेची सुरवात केली. जवळजवळ ६० टक्के उंचीपर्यंत रोप फिक्‍स करून परत खाली बेस कॅम्पला आले. पहिल्या गुहेपर्यंत सर्वांना नेले. जेवणानंतर पहिली टीम दुपारी २.१५ मिनिटांनी शिखरावर पोहोचली.

या सुळक्‍याचे तीन टप्पे उतरताना काळजीपूर्वक उतरावे लागते. लिंगाणा सुळका चढाईच्या अवघड मोहिमेत पूर्ण काळजी घेतली. मोहिमेत ट्रेक किंवा गिर्यारोहणाचा फारसा अनुभव नसलेले ५ सदस्यही होते. या मोहिमेत राजेश नेने, आकाश पालकर, कुंतल खातू, गौरीषा खोत, गौरी शिंदे, अवनी कोतवडेकर, मैत्रेयी मलुष्टे, अबोली मुळे, प्रसाद कासार, तेजस खानविलकर, कपिल नागवेकर, वेद हर्डीकर, ओजस पटेल, ओम पेडणेकर, सौरभ भोंगले, अमेय रुमडे हे सर्व सहभागी झाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News