दहावी, बारावीचे निकाल वेळेतच जाहीर होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • राज्य शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा संपली असली, तरी दहावीचे दोन पेपर व्हायचे आहेत.
  • केंद्रीय मंडळांनी दहावी व बारावीचे पेपर पुढे ढकलले असले, तरी राज्य मंडळामार्फत दहावीची परीक्षा सुरूच आहे.

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीतही दहावी आणि बारावी परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरळित सुरू आहे. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर होतील, असा विश्‍वास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकारी व्यक्त करत आहेत.

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा संपली असली, तरी दहावीचे दोन पेपर व्हायचे आहेत. केंद्रीय मंडळांनी दहावी व बारावीचे पेपर पुढे ढकलले असले, तरी राज्य मंडळामार्फत दहावीची परीक्षा सुरूच आहे.

कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागल्यामुळे सरकारने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असली, तरी शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे दहावी व बारावी परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरू आहे. शाळांमध्ये शिक्षक दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीचे काम करत आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News